सातारा : अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकाविरुद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 17 रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास म्हसवे, ता. सातारा गावच्या हद्दीत ऋषिकेश प्रभाकर शिंदे रा. शाहूनगर सातारा यांच्या दुचाकी क्र. एमएच 11 डीएम 7826 ला समोरासमोर धडक देऊन त्यांना जखमी केल्याप्रकरणी दुचाकी क्र. एमएच 11 डीजी 1089 वरील चालक सुभाष बाबू राठोड रा. म्हसवे, पोस्ट वर्ये, ता. सातारा यांच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक मोरे करीत आहेत.