सातारा : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने जबरी चोरी केल्याप्रकरणी दोनजणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गोडोली, सातारा येथे लिफ्ट देण्याचा बहाणा करुन शिवा ढाणे, रसिक (दोघे रा. विलासपूर, सातारा) या दोघांनी एकाला मारहाण करुन जबरी चोरी केली. सातारा शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी सतिश तुळशीराम ससाणे (वय 34, रा. आर्डे ता.जावली) यांनी तक्रार दिली आहे. ही घटना दि. 10 डिसेंबर रोजी घडली आहे. लिफ्ट देण्याचा बहाणा करुन संशयित दोघांनी तक्रारदार यांना कोयत्याने व हाताने मारहाण करुन रोख 500 रुपये मोबाईल जबरदस्तीने चोरला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.