'ये काली काली आँखे' वेबसीरिजच्या दुसऱ्या सीझनचा उत्कंठावर्धक ट्रेलर रिलीज

by Team Satara Today | published on : 13 November 2024


नेटफ्लिक्सवरील अनेक वेबसीरिजच्या दुसऱ्या सीझनची वाट पाहत आहेत. त्यापैकी एक बहुप्रतिक्षित वेबसीरिज म्हणजे 'ये काली काली आँखे'. ताहिर राज भासीन, श्वेता त्रिपाठी, आँचल सिंग, सौरभ शुक्ला या कलाकारांची वेबसीरिजमध्ये प्रमुख भूमिका होती. या वेबसीरिजचा पहिला सीझन एका उत्कंठावर्धक नोटवर संपला होता. त्यामुळे या वेबसीरिजच्या दुसऱ्या सीझनची सर्वांना उत्सुकता होती. अखेर 'ये काली काली आँखे'च्या दुसऱ्या सीझनचा ट्रेलर रिलीज झालाय.

पहिल्या सीझनमध्ये आपण पाहिलं की, विक्रांतला पूर्वासोबत जबरदस्तीने लग्न करायला भाग पाडलं जातं. विक्रांतचं शिखावर प्रेम असतं. त्यामुळे तो लग्नाच्या मंडपात आग लावतो. पण नंतर त्याला कळतं की, पूर्वा जीवंत आहे आणि तिचं अपहरण करण्यात आलंय. आता दुसऱ्या सीझनमध्ये ही कहाणी पुढे कशी रंजक वळणं घेणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. वेबसीरिजच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता चाळवलीय यात शंका नाही.

'ये काली काली आँखे २'च्या ट्रेलरमध्ये अभिनेता गुरमीत चौधरीची भूमिका सर्वांना सरप्राइज करुन जाणारी आहे. गुरमीत पूर्वीचा मित्र म्हणून पाहायला मिळतोय. वेबसीरिजमध्ये पुन्हा एकदा ताहिर राज भासीन, आँचर सिंग, श्वेता त्रिपाठी, ब्रिजेंद्र काला, सौरभ शुक्ला, अरुणोदय सिंग हे कलाकार प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहेत. २२ नोव्हेंबरला ही वेबसीरिज नेटफ्लिक्सवर पाहायला मिळेल.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मधुमेहावर अत्यंत उपयुक्त घरगुती उपाय
पुढील बातमी
शरद पवारांचे नाव का वापरता?'

संबंधित बातम्या