सातारा : तालुक्यातील कोंडवे येथील 29 वर्षीय सागर हिंदुराव भिसे याने स्मशानभूमीच्या पाठीमागे ओढ्याच्या कडेला असलेल्या करंजाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. त्यास उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून त्यास उपचारापूर्वी मयत झाल्याचे घोषित केले.ही घटना दि २३ रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याबाबतची फिर्याद वडील हिंदुराव गणपत भिसे (वय ५२) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे.अधिक तपास सहाय्यक फौजदार माने करत आहेत.
कोंडवे येथील स्मशानभूमीच्या मागे गळफास घेऊन आत्महत्या
by Team Satara Today | published on : 25 February 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा