आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 19 November 2024


सातारा : आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, स्वप्निल सुभाष घुसाळे राहणार सदर बाजार सातारा हे हद्दपार आदेशाचे उल्लंघन करून दि. 18 रोजी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास पोवई नाका ते सिव्हिल हॉस्पिटल रस्त्यावर मिळून आले आहेत. अधिक तपास महिला पोलीस हवालदार सावंत करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत शोएब मोहम्मद शेख राहणार करंजे पेठ सातारा हे हद्दपार आदेशाचे उल्लंघन करून बॉम्बे रेस्टॉरंट ते वाढे फाटा रस्त्यावर दिसून आले आहेत. अधिक तपास महिला पोलीस हवालदार भवारी करीत आहेत.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
पुढील बातमी
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये साताऱ्याच्या शर्वरी राठोड ला रौप्य पदक

संबंधित बातम्या