पहिल्याच दिवशी विरोधकांचा सभात्याग

शपथ घेतलीच नाही

by Team Satara Today | published on : 07 December 2024


मुंबई : राज्यात नवं सरकार आल्यानंतर पहिल्या विशेष अधिवेशनाला सुरुवात झालीय. महायुतीचे आमदार फेटे परिधान करून विधानसभेत पोहोचले. विधानसभेच्या अधिवेशनाला सुरुवात होण्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह नवनिर्वाचित आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

हंगामी अध्यक्षपदी भाजपच्या कालिदास कोंळबकर यांची निवड करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्षांची घोषणा ९ डिसेंबरला होणार आहे. तर हंगामी अध्यक्ष २८८ आमदारांना शपथ देणार आहेत. यावेळी विधानसभेत ७८ नवे आमदार आहेत. विरोधी पक्षाच्या आमदारांचा आज शपथविधी होणार नाही. विरोधी पक्षाचे आमदार ईव्हीएमचा निषेध नोंदवणार आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज शपथ घेतली नाही. विरोधी पक्षाच्या आमदारांनी सभात्याग केला.

विधानभवनात जाण्याआधी पायऱ्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांची भेट झाली. आदित्य ठाकरे यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शपथविधी पार पडला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महाराष्ट्रात तीन केंद्रीय तर १ नवोदय विद्यालय उभारण्यात येणार
पुढील बातमी
ट्रेव्हिस हेडचा निपटारा करण्यासाठी टीम इंडिया घातक गोलंदाज संघात घेण्याची शक्यता

संबंधित बातम्या