प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ यांचा 27 जानेवारीला सेवा गौरव व ग्रंथ प्रकाशन समारंभ

by Team Satara Today | published on : 25 January 2025


सातारा : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे माजी सहसचिव (प्रशासन व अर्थ), शिवाजी विद्यापीठाचे सिनेट व मॅनेजमेंट कौन्सिल सदस्य, सातारा जिल्हा प्राचार्य असोसिएशनचे अध्यक्ष, शिवाजी विद्यापीठ असोसिएशनचे सेक्रेटरी व लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ हे 40 वर्षांच्या शैक्षणिक क्षेत्रातील प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्ताने त्यांचा सपत्नीक सेवागौरव व गौरवग्रंथ प्रकाशन समारंभ दि. 27 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या शुभहस्ते लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयातील शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे शैक्षणिक संकुल येथे संपन्न होत आहे.

या कार्यक्रमासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले, मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे हे भूषवणार आहेत. कार्यक्रमास राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, आ. जयंत आसगावकर, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डी. के. मस्के प्रमुख उपस्थित राहणार आहेत. या समारंभात प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे संपादित राजससेवा गौरव ग्रंथ, डॉ. राजेंद्र शेजवळ लिखित राजदीपलेखसंग्रह व राजदौलतकविता संग्रहाचे प्रकाशन होणार आहे. हा समारंभ ज्ञानप्रेमी व साहित्य रसिकांसाठी विशेष प्रेरणादायी ठरेल. तरी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, पालक, माजी विद्यार्थी, नागरिकांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजन समितीने केले आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
...तर मानहानीचा दावा ठोकणार आणि राज्यभर टाळे ठोक आंदोलन
पुढील बातमी
छावा चे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना खा. उदयनराजेंचा फोन

संबंधित बातम्या