सलमान-शाहरुखसोबत काम करण्यावर आमिर खानचं वक्तव्य चर्चेत

by Team Satara Today | published on : 22 March 2025


बॉलिवूडचे तीन खान म्हटलं की सलमान, शाहरुख आणि आमिर यांचीच नावं येतात. तिघांनी एकाचवेळी करिअरला सुरुवात केली होती. प्रत्येकाने दमदार यश मिळवलं आणि स्वत:चं अढळ स्थान निर्माण केलं. आज ते हिंदी सिनेमाच्या इतिहासातील सुपरस्टार्स आहेत. सलमान आणि आमिरने एकत्र काम केलं आहे. सलमान आणि शाहरुखही एकत्र झळकलेत. पण आमिर आणि शाहरुख अद्याप एकत्र दिसलेले नाहीत. शिवाय हे तीनही खान एकत्र एका सिनेमात आलेले नाहीत. तीनही खानला सिनेमात एकत्र पाहण्याची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. यावर नुकतंच आमिरने प्रतिक्रिया दिली आहे.

इन्स्टंट बॉलिवूडला दिलेल्या मुलाखतीत आमिर खान म्हणाला, "मी आजपर्यंत शाहरुखसोबत कामच केलेलं नाही. मला त्याच्यासोबत काम करायला नक्की आवडेल. तसंच आम्हाला तिघांनाही एकत्र सिनेमा करायला खूप आवडेल. स्क्रीप्ट चांगली असली पाहिजे. आम्ही याबद्दल वरवर चर्चाही केली आहे. पण ते जरा कठीण आहे कारण तीन अभिनेत्यांचा सिनेमा असणं हे सहसा पाहायला मिळत नाही. पण असं झालं तर आम्हाला तिघांना तर आनंदच होईल. आम्ही कधीच एकत्र काम केलेलं नाही. एक तर आम्हाला काम करताना मजा येईल आणि लोकांनाही पाहायला आवडेल. सिनेमा चांगला बनेल किंवा वाईट बनेल. तसंच वाईट जरी बनला तरी लोकांना आम्हाला स्क्रीनवर एकत्र पाहायला आवडेल."

सलमान आणि आमिरने बऱ्याच वर्षांपूर्वी 'अंदाज अपना अपना'मध्ये काम केलं होतं. तर सलमान-शाहरुखने 'करण-अर्जुन','कुछ कुछ होता है','हम तुम्हारे है सनम' सारख्या काही सिनेमांमध्ये काम केलं आहे. आता तीनही खान एकत्र कधी झळकण्याची शक्यता सध्या कमीच आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
'विकासाचा महामेरू'
पुढील बातमी
कृष्णा नदी योजनेसाठी स्वतंत्र प्राधिकरण हवे

संबंधित बातम्या