सातारा : मारहाणीत जखमी झालेल्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वसंत वायदंडे (रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा) हे मारहाणीत जखमी झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारावेळी त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी विश्वनाथ पाटणकर व सुनील मोरे (दोघे रा.आकाशवाणी झोपडपट्टी) या दोघांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मारहाणीची घटना 17 नोव्हेबर रोजी आकाशवाणी झोपडपट्टी परिसरात घडली होती. फरशीने मारहाण झाल्याने वायदंडे यांच्या पायाला दुखापत झाली होती.
मारहाणीत जखमी झालेल्याचा मृत्यू; दोनजणांवर गुन्हा
by Team Satara Today | published on : 18 December 2024