राष्ट्रीय फुटव्हॉली चॅम्पीयन शिप स्पर्धेत सातारच्या केदारची चमकदार कामगिरी
by Team Satara Today | published on : 09 February 2018

सातारा : छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सातारा जिल्ह्याने देशाला पहिले ऑलंपिक पदक मिळवून दिले. त्या सातार्यात क्रीडा क्षेत्रात आता युवा पिढी उल्लेखनीय कामगिरी करीत आहे. केरळ येथील कोयकंड बीचवर झालेल्या राष्ट्रीय फुटव्हॉली चॅम्पीयन शिप स्पर्धेत कळंबे ता. सातारा येथील केदार राजकुमार देखमुख या डायस युनायटेड स्पोर्ट क्लबच्या खेळाडूने मुंबई उपनगर विभागातनू ंचमकार कामगिरी केली. त्यामुळे महाराष्ट्र संघात त्याची निवड झाली आहे. यशाबद्दल केदारचे अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
सहाव्या राष्ट्रीय फुट व्हॅाली स्पर्धेत देशातून अनेक राज्यातील खेळाडूनी सहभाग घेतला. केरळच्या सुमद्र किनारी या स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी बाजी मारली. प्रशिक्षक व राष्ट्रीय खेळाडू क्याजेटन डायस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र संघाने प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळविला. यामध्ये संकेत जायजोडे, सुरज टेमकल, पृथ्वीराज चव्हाण, श्रेयस कुडाळे, आर्यन आडीवरेकर, सौरभ सुर्यवंशी, दिगंबर खरात, सद्गुरू लोणारी या दहा खेळाडुंची महाराष्ट्राच्या संघात निवड करण्यात आली. यामध्ये सातारच्या केेंदार देशमुख यांची निवड झाल्यामुळे सातारकरांना विशेष आनंद झाला आहे. जागतीक पातळीवर महाराष्ट संघाला 25 वे रँकिंग मिळाले आहे. प्रशिक्षक डायस यांचे मार्गदर्शन व खेळाडुंचे परीश्रम यामुळे हे यश मिळाले असून सातार्यातील खेळाडुंना आता राष्ट्रीय स्तरावर चकमकण्याची संधी मिळाली आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा