जिल्हा परिषद पंचायत समितीमधील प्रारुप आरक्षणावरील हरकती व सुचना 17 ऑक्टोबर पर्यंत सादरकरण्याचे आवाहन

by Team Satara Today | published on : 14 October 2025


सातारा : राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील दि. 1 ऑक्टोबर 2025 रोजीच्या आदेशान्वये सातारा जिल्हा परिषद व त्याअंतर्गत 11 पंचायत समिर्तीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी आरक्षण निश्चित करण्याबाबतचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे.

त्यासअनुसरुन, सातारा जिल्ह्यातील 65 जिल्हा परिषद गट व 130 पंचायत समिती गणाच्या सदस्यांचे आरक्षण सोडत दि. 13 ऑक्टोबर 2025 रोजी काढण्यात आलेली आहे. त्यासअनुसरुन, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील प्रारुप आरक्षणावर हरकती व सूचना सादर करण्याचा कलावधी दि. 14 ऑक्टोबर  ते दि. 17 ऑक्टोबर 2025 असा आहे. तरी, ज्यांना सदर प्रारुप आरक्षणावर हरकत घ्यावयाची आहे त्यांनी वरील नमुद कालावधीमध्ये कार्यालयनी वेळामध्ये गटाच्या बाबतीत ग्रामपंचायत निवडणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे व गणाच्या बाबतीत संबंधित तहसिल कार्यालयाच्या ग्रामपंचायत निवडणूक शाखेमध्ये समक्ष हरकत दाखल करावी. तद्नंतर प्राप्त होणाऱ्या हरकतींचा विचार केला जाणार नाही, असे उपजिल्हाधिकारी महसूल विक्रांत चव्हाण यांनी कळविले आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
नागरी वस्तीत रस्ता रुंदीकरणाला विरोध
पुढील बातमी
साहित्य संमेलन विद्यार्थ्यांना दिशा देईल

संबंधित बातम्या