कोल्हापूर : महायुती, महाविकास आघाडीकडून प्रचाराचा शुभारंभाचा नारळ कोल्हापुरातून फोडण्यात आला. यावेळी एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे यांनी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेऊन राज्यात प्रचाराची सुरुवात केली. यावेळी आपल्या जाहीर सभेतून बोलताना आजी-माजी मुख्यमंत्र्यांनी मात्र कोल्हापुरात येऊन घोषणाचा पाऊस पाडला. या घोषणा सत्यात उतरणार का निवडणुकीनंतर विरघळून जाणार याकडे आता कोल्हापूरवाशीयांचे लक्ष लागून राहिले आहे.
करवीर निवासनी श्री अंबाबाईचे दर्शन घेऊन लोकसभा विधानसभा निवडणुकीचा प्रचाराचा शुभारंभ करण्याची परंपरा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा ती परंपरा कायम ठेवत कोल्हापूरमधून प्रचाराचा नारळ फोडला. कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना शिंदे गटाचे सहयोगी उमेदवार हातकणंगलेमधील अशोकराव माने आणि शिरोळमधील अपक्ष उमेदवार राजेंद्र पाटील यड्रावकर तसेच कोल्हापूर उत्तरचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्यासाठी भव्य सभा पार पडल्या. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार के .पी.पाटील यांच्यासाठी आदमापुरात सभा झाली.
प्रचाराचा शुभारंभ होत असल्याने दोन्ही नेत्यांच्या सभांकडे अवघ्या कोल्हापूर जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून राहिले होते. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार, दोन्ही उपमुख्यमंत्री काय बोलणार आणि महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे काय बोलणार ? याकडे लक्ष होते. उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा करवीर निवासिनी अंबाबाई आणि आदमापुरात बाळूमामांचे दर्शन घेतल्यानंतर के. पी. पाटील यांच्यासाठी सभा घेतली.
यावेळी ठाकरे यांनी बोलताना फुटलेली शिवसेना, गेल्या पाच वर्षातील राजकीय घटनांचा आढावा घेतानाच महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर काय करणार? याची सुद्धा माहिती दिली. यावेळी पाच महत्त्वाच्या घोषणा उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आल्या. यामध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र महिला पोलिसांची भरती हा सुद्धा प्रामुख्याने मुद्दा होता. ठाकरे म्हणाले की, पोलिस ठाण्यात गेल्यानंतर महिलांना कुठे तक्रार करायची, हे अनेकदा लक्षात येत नाही. या पार्श्वभूमीवर राज्यात मविआची सत्ता आल्यास महिला पोलिसांची भरती केली जाईल. पोलीस ते वरिष्ठ पदांवर महिला अधिकारी असलेली पोलीस ठाणे सुरु करण्यात येईल. त्याचबरोबर पाच जीवनावश्यक वस्तूंचे म्हणजेच डाळ, तांदूळ, साखर, तेल या वस्तूंचे भाव आमचे सरकार स्थिर ठेवणार असे सांगितले.
राज्यातील मुलांनाही मोफत शिक्षण दिले जाईल. मुंबईतील अदानी प्रकल्प रद्द करुन त्याठिकाणी धारावीकरांना उद्योग धंद्यासकट घरे देऊ. ग्रामीण भागातील जनतेने मुंबईत यावे. मुंबई तुमची आहे, मराठी माणसाची आहे, असे उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरकरांना सांगितले. राज्यातील शेतकऱ्यांना मविआची सत्ता आल्यास हमीभाव दिला जाईल. आमचं सरकार पडलं नसतं तर यंदाच्या वर्षी शेतकरी कर्जमुक्त झाला असता. पण आमची सत्ता पुन्हा आल्यावर शेतीमालाला हमीभाव देऊ, अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली.
दरम्यान, ठाकरे यांनी महिला सुरक्षांसाठी महिला पोलिसांची स्वतंत्र भरती करणार असल्याची जाहीर करताच संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा दहा मोठ्या घोषणा कोल्हापुरातून केल्या. डाळ, तांदूळ, साखर, तेल या वस्तूंचे भाव आमचे सरकार स्थिर ठेवेल, असे ठाकरे यांनी सकाळी जाहीर केल्यानंतर जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवणार असल्याचे जाहीर केले. महायुतीच्या जाहीरनाम्यातील १० कलमी कार्यक्रम मतदारांसमोर सादर करत प्रचाराचे रणशिंग फुंकले.
राज्यातील लाडक्या बहिणींना प्रतिमाही २१०० रुपये, पोलीस दलात २५ हजार महिलांची भरती. शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेत १५ हजार रुपये. प्रत्येकाला अन्न आणि निवाऱ्यांची हमी. वृद्ध पेन्शनधारकांना २१०० रुपयांची मदत. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवणार. राज्यातील तरुणांना २५ लाख रोजगार देणार. ४५ हजार पांणद रस्ते बांधणार. अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स यांना १५ हजार रुपये वेतन. वीज बिलात ३० टक्के कपात करणार, शंभर दिवसात व्हिजन महाराष्ट्र २०२९ सादर करणार. त्यामुळे आधीच आपल्या ‘घोषणाग्रस्त’ झालेल्या कोल्हापूरमध्ये एक प्रकारे दोन्ही बाजूने घोषणांचा अवघा महापूरच आल्याचे दिसून आले.
कोल्हापुरात रस्ते विकासासाठी कोटींच्या कोटींचे बॅनर्सने लक्ष वेधून घेतले. गुडघाभर खड्डयातून वाट काढताना बॅनर्स बघून शहरवासियांना किती यातना झाल्या असतील, याचाही विचार बॅनर्स लावणाऱ्यांमध्ये दिसून आला नाही. कोल्हापुरातील रस्त्यांच्या निधीबाबत केलेले दावे पाहून कोल्हापूर चकित झाले.
गळफास घेवून युवकाची आत्महत्या |
संविधानाचा आधुनिक राष्ट्र निर्मितीचा संकल्प साकारण्याचे आव्हान : अन्वर राजन |
सातारा एसटी स्टँड परिसरातील बंद टपऱ्या हटवल्या |
जिल्ह्यात कॅबिनेट मंत्रीपदाचा मान कोणाकोणाला ? |
सहकारातील प्रतिकूल परिस्थितीतही गॅलेक्सीने निर्धाराने टाकलेले एकेक पाऊल यशस्वी झाले : रामभाऊ लेंभे |
ग्राहकांनी पाणी देयके 15 डिसेंबरपर्यंत भरावीत |
खा. उदयनराजेंच्या एका फोनने वाचला तरुणाचा जीव |
जनता सहकारी बँक साताराच्यावतीने रविवारी कार्यशाळा, प्रशिक्षण |
जनतेने एक विकासाभिमुख नेतृत्व विधान सभेमध्ये पाठवले : प्रा. दशरथ सगरे |
कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी समोर आत्मक्लेश आंदोलन |
चंद्रशेखर गावस, राजीव मुळ्ये यांना गुंफण पुरस्कार जाहीर |
ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील थंडी गायब |
दिव्यांग-अव्यंग व्यक्तींना विवाहास प्रोत्साहन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन |
फळबागांच्या उत्पादन वाढीसाठी पाडेगाव फार्म येथे खत व्यवस्थापन प्रात्यक्षिक |
पत्नीचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा |
ग्राहकांनी पाणी देयके 15 डिसेंबरपर्यंत भरावीत |
खा. उदयनराजेंच्या एका फोनने वाचला तरुणाचा जीव |
जनता सहकारी बँक साताराच्यावतीने रविवारी कार्यशाळा, प्रशिक्षण |
जनतेने एक विकासाभिमुख नेतृत्व विधान सभेमध्ये पाठवले : प्रा. दशरथ सगरे |
कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी समोर आत्मक्लेश आंदोलन |
चंद्रशेखर गावस, राजीव मुळ्ये यांना गुंफण पुरस्कार जाहीर |
ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील थंडी गायब |
दिव्यांग-अव्यंग व्यक्तींना विवाहास प्रोत्साहन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन |
फळबागांच्या उत्पादन वाढीसाठी पाडेगाव फार्म येथे खत व्यवस्थापन प्रात्यक्षिक |
पत्नीचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा |
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
वृद्ध महिलेच्या फसवणूक प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
मारहाण प्रकरणी दोनजणांवर गुन्हा |
सातारा स्थानिक गुन्हे शाखेची पिस्टलची शतकी कारवाई |
पेरलेत झाडे तोडताना नियमांना 'फाटा' |