फलटणमध्ये भर बाजारपेठेतील बंगला फोडून साडेचौदा लाखाचे सोन्याचांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास

by Team Satara Today | published on : 01 November 2025


फलटण  : भर बाजारपेठेतील शिवशक्ती चौक फलटण येथील बंगल्याच्या दरवाजाचे सेप्टी डोअरचा कडी- कोयंडा  तोडुन घरात प्रवेश करुन बंद बेडरुमच्या दरवाजाचे लॉक तोडू न एकुण 14 लाख 27 हजार रुपये  किंमतीचे सोन्याचांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना घडली आहे. 

 याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी , दि. 29/10/2025 रोजी रात्रौ 01.00 ते सकाळी 07.30 वाजताचे दरम्यान  फलटण येथील अक्षय जितेंद्र दोशी ( वय ३२ ) हे राहत असलेल्या शिवशक्तीचौक, रविवारपेठमधील यांच्या दोन मजली बिल्डींगचे मुख्य दरवाजाचे सेप्टी डोअरचा कडी- कोयंडा कोणीतरी अज्ञात इसमाने तोडू न घरात प्रवेश केला.   पहि ल्या माळ्यावरील बंद बेडरुमच्या दरवाजाचे लॉक तोडुन 3,77,235/- रु. किंमतीचे 63 ग्रॅम  वजनाचे एक सोन्याचे मंगळसुत्र,  3,97,550/- रु. किंमतीचे 66 ग्रॅम  वजनाचे चार सोन्याचे चोकोर,   2,59,151/- रु. किंमतीच्या 43 ग्रॅम 

वजनाचे दोन सोन्याचे कंगण,  3,89,249/- रु. किंमतीचा 65 ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या, 1,257/- रु.किंमतीचे  0.21 मिली  वजनाचे सोन्याचे स्क्रु,  2,565/-  रु.किंमतीचे  0.45 मिली   वजनाची सोन्याची एक  नथ असा   एकुण 14,27,007/- रु. किंमतीचे वरील वर्णनाचे सोन्याचे दागिने  चोरून नेले आहेत.   याप्रकरणी  गुन्हा दाखल करण्यात आला असून  सदर गुन्ह्याचा तपास सपोनि नम  करीत आहेत. घटना घङली त्यावेळी सर्वच्या सर्वजण महाबळेश्वर येथे मुक्कामी गेले होते . त्यामुळे या चोरी  मध्ये जवळचे माहीती गार असण्याची शक्यता व्यक्त होत आहे


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणी एसआयटी स्थापन; आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात तपास होणार
पुढील बातमी
काँग्रेसच्या महिला आघाडीचे साताऱ्यात धरणे आंदोलन; डोळ्यावर काळी पट्टी बांधून निषेध नोंदवला, डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणातील व्यक्ती विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी

संबंधित बातम्या