262- सातारा विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण

आचारसंहितेमुळे महिला लोकशाही दिन रद्द

by Team Satara Today | published on : 18 October 2024


सातारा : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक, २०२४ च्या अनुषंगाने २६२- सातारा विधानसभा मतदार संघामधील आदर्श आचारसंहिता अंमलबजाणीसाठी निवडणुकीसाठी तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी दिली आहे.

२६२ सातारा विधानसभा मतदार संघ एकूण मतदार – ३४१४०८ मतदार आहेत. यामध्ये पुरुष-१७०८५१, स्त्री- १७०५२०, इतर-३७ मतदार आहेत.

मतदान केंद्र सुसूत्रीकरण- नवीन मतदान केंद्र -२०, ग्रामीण १४, शहरी -६ मर्ज मतदान केंद्र - १४, शहरी- १४ ठिकाण बदल मतदान केंद्र -१५, ग्रामीण ७, शहरी- ९ एकूण केंद्र- ४६४, ग्रामीण - ३१६, शहरी-१४८, मतदान केंद्र ठिकाण - एकूण ठिकाण - ३४२, शहरी -६५, ग्रामीण-२७७.

निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी नोडल अधिकारी -३१, भरारी पथक – १४, स्थायी निगरानी पथके- १३, व्हिडिओ सर्विलेंस पथक-८, व्हिडिओ पाहणी पथक-१, स्ट्रॉग रूम ठिकाण -डीएमओ गोडाऊन एमआयडीसी सातारा, मतमोजणी ठिकाण - डीएमओ गोडाऊन एमआयडीसी सातारा. पोलिस बंदोबस्त -४६४ मतदान केंद्रावर करण्यात आला आहे. वेबकास्टींग 232 केंद्रावर करण्यात येणार आहे.

आचारसंहितेमुळे महिला लोकशाही दिन रद्द : ऑक्टोबर महिन्यात सोमवार दि. 21 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथील नियोजन भवनात होणारा महिला लोकशाही दिन विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाली असल्याने संपन्न होणार नाही, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी वि.अं. तावरे यांनी एका पत्रकान्वये दिली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दुचाकी वाहनासाठी एमएच-11 डीएस मालिका सुरु
पुढील बातमी
अजित पवार गटातील नेते अतुल बेनके यांचे शरद पवारांबाबत सूचक विधान

संबंधित बातम्या