सातारा : सेंट्रींग प्लेटांची चोरी केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 17 ते 26 मे दरम्यान कोडोली येथील मोकळ्या जागेतून योगेश मानसिंग निकम रा. संगमनगर, सातारा यांच्या पंधरा हजार रुपये किंमतीच्या लोखंडी सेंट्रिंगच्या प्लेटा अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या आहेत. अधिक तपास पोलीस हवालदार पाटोळे करीत आहेत.