सातारा : करंजे ते एसटी बस स्थानक जाणाऱ्या रस्त्यावर सुभाषचंद्र बोस चौकात दि १६ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकींचा अपघात झाला होता. यामध्ये विकास प्रल्हाद दुदुस्कर यांच्या उजव्या पायाच्या पंजाला डोक्याला आणि मांडीला गंभीर दुखापत केल्याप्रकरणी पल्सर (एम.एच ११ एल ६६९२) वरील चालक रोहित गणेश बनसोडे (रा. करंजे सातारा) याच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार यादव करत असून त्याची फिर्याद पत्नी, शितल विकास दुदुस्कर (वय ३१ रा. वनवासवाडी खेड) यांनी दिली आहे.
नेताजी सुभाषचंद्र बोस चौकातील अपघातप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा दाखल
by Team Satara Today | published on : 19 December 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा