नागेवाडी गावच्या हद्दीत असलेल्या जाधव स्टोन क्रेशरवरील साहित्याची चोरी करणाऱ्यास रंगेहाथ अटक

by Team Satara Today | published on : 21 March 2026


सातारा : सातारा तालुक्यातील नागेवाडी गावच्या हद्दीत असलेल्या जाधव स्टोन क्रेशर येथून 28 हजार 500 रुपयांच्या लोखंडी साहित्याची चोरी करणाऱ्या चोरट्यास तालुका पोलिसांनी रंगेहात ताब्यात घेतला आहे.

याप्रकरणी रोहित दिलीप कुऱ्हाडे  (वय ३६, व्यवसाय क्रेशर, रा. मंगळवार पेठ,सातारा) यांनी फिर्याद दिली असून जवाहर लक्ष्मण गायकवाड (वय ४७ रा. प्रतापसिंहनगर,सातारा) याच्या विरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

त्याच्याकडून ४ हजार रुपये किमतीचा हिरव्या रंगाचा लोखंडी मोटर कव्हर, ४ हजार रुपये किमतीचे लोखंडी टेन्शन बोर्ड, २ हजार रुपये किमतीचे लोखंडी पेडेस्टल बेरिंग, ५ हजार रुपये किमतीचे लोखंडी सुपड्याच्या प्लेटा,दीड हजार रुपये किमतीचे स्टार्टरचे एमसीबी,१२ हजार रुपये किमतीचे इतर भंगाराचे साहित्य असा ४० किलो वजनाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार गायकवाड करत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
म्हसवे येथे गळफास घेऊन एकाची आत्महत्या
पुढील बातमी
'चवदार तळे' सत्याग्रहातून समतेची मुहूर्तमेढ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णांकृत पुतळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी

संबंधित बातम्या