सातारा : बेकायदा दारु विक्री प्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आरफळ ता.सातारा येथे बेकायदा दारु विक्री प्रकरणी बाबूराव विठोबा साबळे (वय 77, रा. आरफळ) याच्या विरुध्द सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 840 रुपये किंमतीच्या 24 बाटल्या जप्त केल्या आहेत.