कराड उपविभागीय अधिकारी, अव्वल कारकून यांच्या खातेनिहाय चौकशी करा : गणेश पवार

by Team Satara Today | published on : 07 October 2025


कराड  : संजय गांधी योजनेचे अव्वल कारकून युवराज पाटील यांना निलंबीत करुन खातेनिहाय चौकशी करावी, उपविभागीय अधिकारी तथा मतदान नोंदणी अधिकारी दक्षिण विधानसभा मतदारसंघ यांचीही योग्य ती चौकशी करून कारवाई करावी, त्याचबरोबर कापील येथिल त्या नऊ मतदारावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अन्यथा 8 ऑक्टोंबर पासून आंदोलन व उपोषण करणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

अधिक माहिती देताना गणेश पवार म्हणाले की, कराड तहसिल कार्यालयातील संजय गांधी योजनेचे अव्वल कारकून युवराज वसंतराव पाटील यांचे तलाठी पदावरुन जिल्हाधिकारी, सातारा यांच्याकडील क्र. मह/२/आस्था/२/कावि.९२२/२०१३ दि.०१.१०.२०१३ आदेशान्वये पदोन्नतीने बदली मंडलाधिकारी, सैदापूर या पदावरती झाली होती. युवराज पाटील यांनी सैदापूर मंडल अधिकारी या पदावरती काम करीत असताना जिल्हाधिकारी, सातारा यांचेकडून क्र. मह/२/आस्था/१/कावि. ७४० (४)/२०१८ या आदेशाने दि. २१.०५.२०१८ रोजी युवराज वसंतराव पाटील यांची सैदापूर मंडल अधिकारी या पदावरुन कराड तहसिल कार्यालयातील इंदिरा गांधी योजनेच्या अव्वल कारकून या पदावरती बदली करण्यात आली. इंदिरा गांधी योजनेच्या अव्वल कारकून या पदावरती युवराज पाटील यांनी ५ वर्ष काम केले आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी, सातारा यांनी क्र. मह/२/आस्था/१/कावि.५२२(४)/२०२३ या आदेशाने दि. ३१.०५.२०२३ रोजी युवराज वसंतराव पाटील यांची कराड तहसिल कार्यालयातील इंदिरा गांधी योजनेच्या अव्वल कारकून या पदावरुन कराड तहसिल कार्यालयाच्या संजय गांधी योजनेच्या अव्वल कारकून या पदावरती बदली करण्यात आली आहे.

युवराज वसंतराव पाटील यांची कराड तहसिल कार्यालयाच्या संजय गांधी योजनेच्या अव्वल कारकून या पदावरती बदली झालेली असताना त्यांनी संजय गांधी योजनेचे काम करणे अपेक्षित असताना त्यांनी तिथे काम न करता ते निवडणूक शाखेमध्ये काम करीत आहे.  मुळात युवराज पाटील हे तलाठी वर्गातून पदोन्नतीने मंडल धिकारी झालेले आहेत. तसेच नायब तहसिलदार संवर्गात पदोन्नती करीता मंडल अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामाचा अनुभव येण्यासाठी त्यांनी कार्यालयामध्ये दोन वर्ष काम करण्याबाबत दि. २९.१०.२०२० चा शासन निर्णय आहे.

युवराज पाटील यांनी कराड तहसिल कार्यालयातील इंदिरा गांधी योजनेच्या अव्वल कारकून या पदावरती ५ वर्ष काम केले आहे तसेच कराड तहसिल कार्यालयातील संजय गांधी योजनेच्या अव्वल कारकून या पदावरती गेल्या २ वर्षापासून काम करीत आहेत. म्हणजे एकूण ७ वर्षे ते कराड तहसिल कार्याल्यातील इंदिरा गांधी व संजय गांधी योजनेच्या शाखेमध्ये काम करीत आहेत आणि ते अजून किती वर्षे कराड तहसिल कार्यालयात काम करणार आहेत. कारण, मंडल अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामाचा अनुभव येण्यासाठी त्यांनी २ वर्षे काम करणेबाबतचा हा शासन निर्णय असतानाही युवराज पाटील यांना तो लागू का केला गेला नाही याबाबत ही चौकशी होणे आवश्यक आहे.

युवराज वसंतराव पाटील यांची कराड तहसिल कार्यालयातील संजय गांधी योजनेच्या अव्वल कारकून या पदावरती बदली झालेली आहे, परंतु ते संजय गांधी योजनेचे काम न करता त्यांनी तहसिल कार्यालयातील निवडणूक शाखेचे आदेश नसताना काम केले आहे. याबाबत कराड तहसिल कार्यालयातील निवडणूक शाखेमध्ये निवडणूक शाखेचे नायब तहसिलदार हे पद रिक्त होते. यासाठी या रिक्त पदाचा कार्यभार जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा यांच्या कार्यालयातून युवराज पाटील संजय गांधी योजनेचे अव्वल कारकून यांचेकडे दि. ३१.०८.२०२३ रोजी देण्यात आला होता. या आदेशामध्ये उपरोक्त विषय संदभर्भीय पत्रांवर विनंती करण्यात आलेनुसार निवडणूक नायब तहसिलदार, तहसिल कार्यालय, कराड या रिक्त पदाचा कार्यभार श्री. युवराज पाटीला, संजय गांधी योजनेचे अव्वल कारकून तहसिल कार्यालय, कराड यांचेकडे अतिरीक्त स्वरुपात सुपुर्द करण्यात आलेल्या आपले कार्यालयाच्या आदेशास यान्वये कार्योत्तर मंजूरी देण्यात येत आहे. असे नमूद आहे. 

या आदेशाच्या अनुषंगाने युवराज पाटील यांनी संजय गांधी योजनेचे काम करुन निवडणूक शाखेमध्येही काम करणे अपेक्षित होते, परंतु त्यांनी संजय गांधी योजनेचे कोणत्याही प्रकारचे काम केलेले नाही. त्यांनी पूर्णवेळ निवडणूक शाखेमध्ये  काम केलेले आहे. तसेच शासन निर्णय क्र. पदोन्न २०२४/प्र.क्र.०८ (भाग २)/ई ९ दि. १३ मार्च २०२४ च्या निर्णयानुसार हेमंतकुमार लक्ष्मण बेसके यांची निवडणूक नायब तहसिलदार कराड या पदावरती पदोन्नतीने बदली झाल्याने ते दि. १४.०३.२०२४ रोजी हजर झालेले आहेत.

हेमंतकुमार लक्ष्मण बेसके हे निवडणूक नायब तहसिलदार कराड या पदावर हजर झाल्यानंतर संजय गांधी योजनेचे अव्वल कारकून युवराज पाटील यांचेकडे अतिरीक्त स्वरुपात रिक्त पदाचा कार्यभार देण्यात आला होता, तो संपला होता. त्यानंतर त्यांनी निवडणूक शाखेतून संजय गांधी योजनेच्या अव्वल कारकून या पदावरती येऊन काम करणे अपेक्षित होते, परंतु ते संजय गांधी योजनेचे काम न पाहता ते कोणाचाही आदेश नसताना ते कराड तहसिल कार्यालयाच्या निवडणूक शाखेमध्येच काम करीत आहेत.

तसेच कराड तहसिलदार यांनी दि. २३.०६.२०२५ रोजी दैनंदिन कामकाज विहित मुदतीत पार पाडणे कामे कर्मचारी यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. या अनुषंगाने एक आदेश काढलेला आहे. यामध्ये त्यांनी पूर्वीच्या संकलनाचे नांव व या आदेशात देण्यात येणाऱ्या संकलनाचे नांव टाकून आदेश दिलेला आहे. या आदेशामध्ये युवराज पाटील निवडणूक सहाय्यक महसूल अधिकारी हे पूर्वीच्या संकलनामध्ये काम करीत आहेत, असे नमूद केले आहे. तसेच आदेशान्वये देण्यात येणारे संकलन निवडणूक सहाय्यक महसूल अधिकारी असे नमूद करुन आदेश दिलेला आहे.

यावरुन असे दिसून येत आहे की, जिल्हाधिकारी यांचेकडून दि. ३१.०८.२०२३ रोजी संजय गांधी योजनेचे अव्वल कारकून युवराज पाटील यांचेकडे रिक्त पदाचा अतिरीक्त स्वरुपात कार्यभार दिला होता. तो संपलेला असतानाही संजय गांधी योजनेचे अव्वल कारकून युवराज पाटील यांना कोणताही आदेश नसताना ते निवडणूक शाखेमध्ये काम करीत होते व संजय गांधी शाखेमध्ये हजर नसतानाही त्या पदाचा त्यांनी पगार घेतलेला आहे. तसेच कराड तालुक्यातील विधानसभा मतदारसंघामध्ये बनावट आधार कार्ड तयार करुन बोगस मतदान वाढवणे, पूर्वींच्या मतदारसंघातून नांव कमी न करता कराड तालुक्यातील विधानसभा मतदारसंघामध्ये नव्याने नांव वाढवणे या सर्व गोष्टींमध्ये युवराज वसंतराव पाटील यांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरुन या सर्व गोष्टी केलेल्या आहेत.

त्यामुळे संजय गांधी शाखेचे अव्वल कारकून युवराज पाटील यांचे निलंबन करुन त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी. त्यांचे निलंबन करुन खातेनिहाय चौकशी केली गेली नाही तर मी दि.०८.१०.२०२५ रोजीपासून काही दिवस धरणे आंदोलन, काही दिवस ठिय्या आंदोलन व नंतर आमरण उपोषण करणार आहे, असे तक्रारी अर्ज मा. विभागीय आयुक्त साो, पुणे व मा. जिल्हाधिकारी साो, सातारा यांना देण्यात आले होते, परंतु याबाबत त्यांनी कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे मी दि.०८.१०.२०२५ रोजीपासून काही दिवस धरणे आंदोलन, काही दिवस ठिय्या आंदोलन व नंतर आमरण उपोषणास बसणार आहे. 




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सदोष वैद्यकीय सेवा पुरवल्‍याबद्दल १२ लाख रुपये दंडाची डॉ. स्‍मिता कासार यांना शिक्षा
पुढील बातमी
शाहूपुरी विद्यालयाचा सातारा तालुका मैदानी क्रीडा स्पर्धेत डंका ; खेळाडूंचे वैयक्तिक खेळ प्रकारात उज्वल यश

संबंधित बातम्या