कोरेगाव मतदारसंघ भयमुक्त करण्यासाठी जनतेतून उठाव : आ. शशिकांत शिंदे

संगमनगर येथील मेळाव्यात हजारो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश; महेश शिंदे गटाला धक्का

by Team Satara Today | published on : 26 October 2024


आ. महेश शिंदे यांना धक्का...
या मेळाव्यात भाजपच्या पंचायत समितीच्या माजी सदस्या रंजना जाधव, क्षेत्रमाहुलीच्या सरपंच नुतन सावंत, उपसरपंच सत्यवान जाधव यांच्यासह खेड, प्रतापसिंहनगर, क्षेत्र माहुली, सोनगाव स. निंब येथील ग्रामपंचायत सदस्य, विकास सेवा सोसायटीचे पदाधिकारी व हजारो युवक कार्यकर्त्यांनी आ. शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे आ. महेश शिंदे गटाला जोरदार धक्का दिला असल्याचे बोलले जात आहे.
 
खा.उदयनराजे व माझे वाद नाहीत.
या मेळाव्यात बोलताना आ. शशिकांत शिंदे म्हणाले खा. श्री. छ.  उदयनराजे भोसले आमच्या पक्षात असताना त्यांना निवडून आणण्यासाठी मी पायाला भिंगरी लावून काम केले, मदत केली आहे हे येथील मतदारांना माहीत आहे. मी कोणत्याही आव्हानाला घाबरणारा कार्यकर्ता नाही. मी पक्षासाठी लढतो. त्यांचे व माझे कोणतेही वैयक्तिक मतभेद किंवा वाद नाहीत, असेही आ. शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले.

या मेळाव्यास जि.प. चे माजी शिक्षण व अर्थ समितीचे सभापती सतिश चव्हाण, माजी उपसभापती साहेबराव जाधव, माजी सरपंच हरिभाऊ लोखंडे, युवा नेते संतोष भाऊ जाधव, कामेश कांबळे, संदिप दादा मोझर, प्रकाश जाधव, अंजली निकम, विरसिंग जाधव, अश्विनी कदम, विजय शिंदे, सुरेश कदम, सुनिल शिंदे नंदकुमार शिंदे, कल्याण शिंदे यांच्यासह क्षेत्रमाहुली, सोनगाव स.निंब, खेड, प्रतापसिंहनगर, संगमनगर, विकासनगर, संगममाहुली, महागाव येथील ग्रामपंचायतीचे सदस्य, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन, सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.






लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सातारा तालुका पोलिसांचा रुटमार्च
पुढील बातमी
सातारा पालिकेची टपरीवाल्यांना सहा दिवसांची डेडलाईन

संबंधित बातम्या