अवैध दारु विक्रीप्रकरणी वृद्धेवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 19 October 2024


सातारा : अवैधरित्या दारु विक्रीप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी एका वृद्धेवर कारवाई केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, येथील अजंठा चौकातील पत्र्याच्या शेडच्या आडोशाला हिराबाई राजाराम निंबाळकर (वय 62, रा. गोपाळवस्ती, अजंठा चौक, सातारा) ही अवैधरित्या दारुविक्री करत होती. दि. 18 रोजी पोलीस शिपाई सुशांत कदम यांनी कारवाई केली. तिच्याकडून गावठी हातभट्टीची 7 हजार रुपयांची 70 लिटर दारु जप्त केली आहे. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
तेल्ली खड्डा येथील जुगार अड्ड्यावर कारवाई
पुढील बातमी
भांडणे सोडवण्यास गेलेल्यास मारहाण

संबंधित बातम्या