अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षामार्फत आरोग्य तपासणी; ७३ नागरिकांची स्वच्छेने अवयव दानाकरिता लिखित संमती

by Team Satara Today | published on : 09 January 2026


सातारा  :  99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष व आरोग्य तपासणी कक्षामार्फत सुमारे ३५९ नागरिकांची मोफत तपासणी केली असून त्यामध्ये प्रथोमपचार, औषध वाटप, रक्त तपासणी, बी. पी. तपासणी करण्यात आली होती व त्याचबरोबर ७३ नागरिकांनी स्वच्छेने अवयव दानाकरिता लिखित संमती दिली.

संमेलनास भेट देणाऱ्या नागरिकांची आरोग्य यंत्रणेने पूर्ण काळजी घेतली.  त्याचबरोबर जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाद्वारे वैद्यकीय सहायताबाबत शेकडो नागरिकांपर्यंत जनजागृती करण्यात आली. १ जानेवारी ते ४ जानेवारी २०२६ या कालावधीत हे संमेलन आयोजित संमेलनामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य पथक व जिल्हास्तरीय स्थापित मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने सुरळीत पार पडले.

आरोग्य तपासणी कक्षाचे उदघाटन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांच्याहस्ते झाले. यावेळी आरोग्य सेवेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष व वैद्यकीय तपासणी कक्षाला भेट देऊन आढावा घेतला. शेकडो नागरिकांपर्यत मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षा द्वारे जिल्ह्यातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा लाभ घेण्याबाबत कक्षातील प्रतिनिधींनी नागरिकांना माहिती दिली. तसेच मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत कोणकोणते आजार निकषात बसतात, अर्जा सोबत कोणकोणते आवश्यक कागदपत्रे लागतात आणि धर्मादाय रुग्णालय मार्फत लाभ मिळवण्याबाबत कार्यप्रणाली कशी आहे याबद्दल नागरिकांना माहिती देण्यात आली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सोयाबीन खरेदीच्या नोंदणीसाठी 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ; सातारा, वडूज व वाई येथेही खरेदी केंद्र सुरू करण्यास शासनाची मान्यता
पुढील बातमी
मुख्याधिकारीपद रिक्त असतानाही कोरेगाव नगरपंचायत मिळकतकर वसुलीत जिल्ह्यात प्रथम, राज्यात तृतीय क्रमांकाची कामगिरी

संबंधित बातम्या