जुगार प्रकरणी तीनजणांवर कारवाई

by Team Satara Today | published on : 09 August 2025


सातारा : जुगार प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी तीनजणांवर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, येथील नगरपालिकेच्या समोरील पाणी टाकीच्या आडोशाला सागर शाम महामुने (वय 43, रा. शनिवार पेठ, देवी चौक, सातारा) हा दि. 8 रोजी जुगार घेताना आढळून आला. त्याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल तुषार हणमंत भोसले यांनी कारवाई केली.
दुसर्‍या कारवाईत, गोडोतील पालवी हॉटेलच्या पाठिमागे सचिन भानुदास औघडे (वय 41, रा. सासपडे, ता. सातारा), शाहरुख काझी (रा. सातारा) हे दि. 8 रोजी जुगार घेताना आढळून आले. त्यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलीस कॉन्स्टेबल सागर गायकवाड यांनी कारवाई केली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
पुढील बातमी
कृष्णानगर येथे दुकान फोडून वीस लाखाचे नुकसान

संबंधित बातम्या