मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज; पहिल्या तासाभरामध्ये येणार पहिला निकाल : महामंडळाच्या गोडाऊनला पोलिसांचा बंदोबस्त

by Team Satara Today | published on : 08 February 2026


सातारा :  जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्ह्यात शनिवारी (दि. ७) सरासरी ६८ टक्के मतदान झाले. जिल्हा परिषदेच्या ६५ गटांसाठी व पंचायत समितीच्या १२९ गणांसाठी जिल्ह्यात सरासरी ६५ टक्के मतदान झाले. जिल्हा परिषदेच्या २३१ तर पंचायत समितीच्या ३९५ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात सीलबंद झाले आहे. आता सोमवारी (दि.९) होणाऱ्या मतमोजणी प्रक्रियेची प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. सकाळी अकरा वाजेपर्यंत पहिला निकाल येण्याची शक्यता असून या लढतीत बाजी कोण मारणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

सोमवारी (दि. ९) सातारा तालुक्याची होणारी मतमोजणी एमआयडीसी कोडोली येथील गोदामात, तर कराड तालुक्याची मतमोजणी शनिवार पेठेतील शासकीय धान्य गोदामात होणार आहे.

जिल्ह्यात जिल्हा परिषदेसाठी ६५ गट व ११ पंचायत समित्यांमधील १३० गणांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. त्यात माण तालुक्यातील आंधळी पंचायत समिती गणाची एक जागा बिनविरोध झाल्याने जिल्हा परिषदेच्या ६५ गट व पंचायत समितीच्या १२९ गणांसाठी शनिवारी मतदान प्रक्रिया अपवादात्मक वगळता सर्वत्र शांततेत पार पडली.

या निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण २१ लाख ९४ हजार ११० मतदारांची नोंदणी झाली होती. यामध्ये पुरुष मतदार ११ लाख ८ हजार २०३, महिला मतदार १० लाख ८५ हजार ८४७, तर इतर ६० मतदार आहेत. मतदानासाठी जिल्ह्यात २ हजार ८७७ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली होती. आता सोमवारी झालेल्या मतदानाची मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. प्रशासनाने मतमोजणी प्रक्रिया शांततेत व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.प्रत्येक टेबलला 16 कर्मचारी मुलांचे कडून गट आणि गणनिहाय मतमोजणी केली जाणार असून सर्वप्रथम टपाली मतदान हे मोजले जाणार आहे .तत्पूर्वी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या सूचनेप्रमाणे अधिकार प्राप्त झालेले निवडणूक निर्णय अधिकारी निवडणूक प्रक्रियेची रंगीत तालीम घेणार आहेत .महसूल यंत्रणा आणि पोलीस प्रशासन यांच्या उपस्थितीमध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ची सील उघडले जाणार आहेत .सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीने 61 तर अजित दादा पवार घडले 41 उमेदवार उभे केले होते .हरी लढत राष्ट्रवादी विरुद्ध भाजप विरुद्ध शिवसेना अशीच असणार आहे .महायुतीच्या तीन घटक पक्ष मधील राजकीय संघर्ष कोणत्या वर्णावर जातोय हे अधिकार नंतर स्पष्ट होणार आहे .

जिल्ह्यातील मतमोजणीची ठिकाणे :

सातारा - जिल्हा मार्केटिंग फेडरेशन गोदाम, एमआयडीसी कोडोली (गोदाम क्र. १ व २)

कराड - शासकीय धान्य गोदाम, शनिवार पेठ

पाटण - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह

कोरेगाव - डी. पी. भोसले कॉलेज, इनडोअर हॉल

वाई - नवीन प्रशासकीय इमारत, पहिला मजला, सोनगिरवाडी, वाई

खंडाळा - नवीन प्रशासकीय इमारत, पहिला मजला, तहसील कार्यालय

महाबळेश्वर - गिरीस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय

फलटण - शासकीय धान्य गोदाम

माण - शासकीय धान्य गोदाम, दहिवडी

खटाव - निवडणूक निर्णय अधिकारी कक्ष, बैठक हॉल, नवीन प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय, वडूज


स्ट्राँगरूमभोवती कडक बंदोबस्त...

शनिवारी सायंकाळी मतदान झाल्यानंतर मतदान यंत्रे तालुक्याच्या ठिकाणी आणण्यात आली. दुर्गम भागातील यंत्रणा पोहोचण्यासाठी उशीर झाला. ही यंत्रे मतमोजणी होणाऱ्या ठिकाणाजवळच्या स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात आली आहेत. तेथे सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आलेली आहे. तसेच पोलिसांचाही कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आज होणार फैसला - साताऱ्याच्या ‘मिनी मंत्रालय’वर कुणाची सत्ता?; भाजपचा वारू रोखणार का राष्ट्रवादी?
पुढील बातमी
मसाप, शाहूपुरी शाखेच्या साहित्य पुरस्कारासाठी साहित्य पाठवा - नंदकुमार सावंत यांचे आवाहन

संबंधित बातम्या