सातारा : करंजे पेठ येथील शिक्षण प्रसारक संस्था संचलित श्रीपतराव पाटील हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी "आनंददायी शनिवार" या उपक्रमा अंतर्गत "विविध गुणदर्शन" हा कार्यक्रम सादर केला. संस्था सचिव तुषार पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे हा कार्यक्रम नियोजनबद्ध व व्यवस्थित व्यवस्थित पार पडला.
इयत्ता पाचवी ते नववीचे विद्यार्थी मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते. बाल कलाकारांनी सादर केलेल्या नृत्यांना टाळ्यांची दाद देत तर विनोदी नाटकावेळी हास्याचे फवारे उडवत उपस्थित पालक, शिक्षक व विद्यार्थी यांनी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. कार्यक्रम उत्तमरीत्या सादर करण्यासाठी शिक्षण प्रसारक संस्थेच्या अध्यक्षा सौ. वत्सला डुबल, उपाध्यक्ष नंदकिशोर जगताप, जगन्नाथ किर्दत, चेअरपर्सन सौ.प्रतिभा चव्हाण, सर्वच संचालक, विद्यालयाचे मुख्याध्यापक अमरसिंह वसावे, पर्यवेक्षक यशवंत गायकवाड , शिक्षक वृंद व पालक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.