सातारा : मूकबधिर विद्यालय व मतिमंद विद्यालय यांच्यावतीने येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर सार्वजनिक रस्त्यावर भव्य दिव्य हस्तकला प्रदर्शनाचे दोन आयोजन करण्यात आले होते.
जागतिक अपंग दिन सप्ताहानिमित्त येथील समता शिक्षण प्रसारक मंडळ संचालित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.औपचारिक उद्घाटन समाजकल्याण अधिकारी विद्यानंद चलावार यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी दादासाहेब केंगार,चंद्रकांत खंडाईत,बी.एल.माने,अनिल वीर आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थीत होते.
सदरच्या सप्ताहामध्ये हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन करून मुलांची प्रभात फेरी काढुन अभिवादन करण्यात आले. चित्रकला रंगभरण स्पर्धा व फनी गेम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.पालकांची सहविचार घेऊन दिव्यांगाना शासनाकडून मिळणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. फॅन्सी ड्रेस स्पर्धाही मोठ्या उत्साहात घेण्यात आल्या. याशिवाय,क्रीडा व रांगोळी स्पर्धाही होणार आहेत.
प्रभारी मुख्याध्यापक ज्ञानेश्वर ढोले यांनी प्रास्ताविक केले. सरचिटणीस सिनल यादव व हस्तकला शिक्षक किरण जगताप यांनी सूत्रसंचालन केले.हस्तकला शिक्षिका हेमलता जगताप यांनी आभारप्रदर्शन केले.