सातारा : कोरेगांव तालुक्यात मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देणेसाठी अधिनस्त कार्यालयामध्ये सदर नोंदीचे अभिलेख तपासणी करून ज्या अभिलेख्यानुसासर नोंदी आढळल्या आहेत. त्याची यादी https://drive.google.com/drive/folders/1bL-Kk9TivnD- DQxJAWD1dk8eouXpbwwt?usp=sharing या वेबसाईटवर प्रसिध्द करणेत आली आहे, अशी माहिती कोरेगावचे उपविभागीय अधिकारी अभिजीत नाईक यांनी दिली आहे.
कोरेगांव तालुक्यामध्ये, ज्यांना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे दाखला उपविभागीय अधिकारी कार्यालय कोरेगांव उपविभाग कोरेगांव कार्यालयातून काढावाचे आहेत त्यांनी आवश्यक पुराव्याच्या अभिलेखासह अर्ज, सेतू सुविधा केंद्र तहसील कार्यालय, कोरेगांव येथे दाखल करावेत. त्याप्रमाणे दाखला वितरीत करणेची कार्यवाही करण्यात येईल, असे उपविभागीय अधिकारीनाईक यांनी कळविले आहे.