"नशा मुक्त भारत" साठी धावणार सातारकर

भाजप जिल्हाध्यक्ष आ. डॉ. अतुल भोसले; साताऱ्यात नमो युवा रन मॅरेथॉन

by Team Satara Today | published on : 19 September 2025


सातारा  :  भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दि. २१ सप्टेंबर २०२५ रोजी संपूर्ण भारतात, प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्ह्यात नमो वा रन, मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यात या मॅरेथॉनची तयारी पूर्ण झाली असून " नमो युवा रन, राजधानी सातारा" असे नाव या मॅरेथॉनला देण्यात आले असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष आ. डॉ. अतुल भोसले यांनी दिली.

त्यांनी सांगितले की, खा. उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आ.मनोज घोरपडे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ.विक्रांत पाटील, माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशिल कदम, लोकसभा समन्वयक सुनील काटकर, माजी आ.दिलिप येळगावकर, मदन भोसले, आनंदराव पाटील, सत्यजितसिंह पाटणकर, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, प्रदेश सचिव भरत पाटील, प्रिया शिंदे, रामकृष्ण वेताळ, अनुप मोरे, राजू भोसले, प्रदेश सदस्य अविनाश कदम, उपनगराध्यक्ष अमोल मोहिते ,संग्राम बर्गे, सुदर्शन पाटसकर, सुरभी भोसले यांच्याबरोबरच सर्वच प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मॅरेथॉन होणार आहे.

मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी करण्यात आली असून जवळपास २००० स्पर्धकांनी यात सहभाग नोंदवला आहे. दि. २० रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत छ शाहू महाराज स्टेडियम येथे एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. मॅरेथॉनच्या पूर्ण मार्गावर पाणी, औषधे या साठी वॉटरस्टेशनची व्यवस्था करण्यात आली असून स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी विविध ठिकाणी महाराष्ट्रातील लोकनृत्य करण्यात येणार आहेत.

पोलिस परेड ग्राउंडवरून दि. २१ तारखेला सकाळी ६.३० वाजता मॅरेथॉनला सुरुवात करण्यात येणार असून शिवतीर्थ, महाराजा सयाजीराव विद्यालय, नगरपालिका कार्यालय, कमानी हौद, देवी चौक, मोती चौक , गोलबाग , परत मोती चौक , पंचमुखी गणपती मंदिर, शनिवार चौक, शेटे चौक, पोलिस मुख्यालय, पोवई नाका आणि परत पोलिस परेड ग्राउंड या ठिकाणी मॅॅरेथॉन चा समारोप होईल. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्यातील पदाधिकारी प्रयत्न करत आहेत. "नमो युवा रन, राजधानी सातारा , नशा मुक्त भारत मॅरेथॉन " च्या स्वागतासाठी आणि स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी सर्व सातारकरांनी सहभागी व्हावे असे आवाहन भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हाध्यक्ष आमदार डॉ अतुल भोसले यांनी केले


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात जुगारप्रकरणी एकावर गुन्हा
पुढील बातमी
कटगुणमधील खुनातील संशयित पतीला कोठडी

संबंधित बातम्या