अजिंक्यतारा कारखान्यास 'ग्रीन वर्ल्ड को प्राईड' पुरस्कार प्रदान ; कारखाना परिवार व कार्यक्षेत्रात आनंदाचे वातावरण

by Team Satara Today | published on : 23 December 2025


सातारा : अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादकांना दिलेले पेमेंट, साखर उत्पादनातील गुणवत्ता, उत्पादन खर्चातील सुव्यवस्था आणि कारखाना व्यवस्थापनातील पारदर्शकता या बाबींचा विचार करून ग्रीन वर्ल्ड, पुणे या नामांकित प्रकाशन संस्थेने 'ग्रीन वर्ल्ड को-प्राईड २०२५" या पुरस्काराने कारखान्याचा गौरव केला आहे. पुणे येथे झालेल्या शानदार समारंभात राज्याचे सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते सदर पुरस्काराचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी साखर आयुक्त डॉ. संजय कोलते, सहकार आयुक्त दिपक तावरे, राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष अॅड. प्रल्हाद कोकरे, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष सीए मिलिंद काळे व ग्रीन वर्ल्डचे अध्यक्ष गौरव कोतवाल उपस्थित होते.

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे मार्गदर्शना खाली व कारखान्याचे संचालक मंडळ यांच्या सहकार्याने कारखान्याचे कामकाज नियोजनबद्ध व शेतकऱ्यांना केंद्र बिंदू मानून यशस्वीपणे सुरु आहे, कारखान्याच्या उल्लेखनीय कामकाजाची नोंद घेवून केंद्र व राज्य स्तरावरील अनेक पुरस्कार कारखान्याला प्राप्त झाले असून या पुरस्काराने कारखान्याच्या नावलौकीकात भर पडली असल्याचे मत कारखान्याचे कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते यांनी याप्रसंगी व्यक्त केले. हा पुरस्कार मिळाल्यामुळे कारखाना परिवार व कार्यक्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सारंगखेड्यातील प्रसिद्ध नृत्य करणारा घोडा ‘राजू ३’ करंजेत दाखल; गणेश वाघ यांच्या नेतृत्वाखाली भव्य मिरवणूक
पुढील बातमी
खटाव तालुक्यातील बुध परिसरात रानडुकरांचा उच्छाद; शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी, शेतकरी जेरीस

संबंधित बातम्या