बांधकाम विभागाच्या अतिक्रमणाविरोधात आत्मदहनाचा इशारा; रक्षक प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष मनोज माळी यांचे निवेदन

by Team Satara Today | published on : 25 January 2026


कराड :  अंतवडी, ता. कराड  येथील रस्त्याच्या कामासाठी बांधकाम विभागाने केलेल्या बेकायदेशीर अतिक्रमणाविरोधात तहसील कार्यालयासमोर प्रजासत्ताक दिनी सोमवारी, दि. 26 आत्मदहन  करणार असल्याचा इशारा रक्षक प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष मनोज माळी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

याबाबतचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, सार्वजनिक बांधकाम विभाग मायणी ते निसरे फाटा रस्त्याचे काम करत आहे. या रस्त्यासाठी बांधकाम विभागाकडून ८ मीटर भूसंपादन आधीच करण्यात आले आहे. एक रस्ताही बनवण्यात आला आहे. परंतु मौजे अंतवडी येथे सध्याच्या ८ मीटर रस्त्याच्या पलीकडे शेतकऱ्यांच्या मालकीची अतिरिक्त जमीन संपादित केली जात आहे. प्रत्यक्षात रस्त्याच्या कामांसाठी शेतकऱ्यांची जमीन घेतली जात आहे. यासाठी परवानगी घेतलेली नाही. तसेच बांधकाम विभागासह सरकारी नियमांनुसार सरकारने कोणतीही आर्थिक भरपाई दिलेली नाही. याबाबत कोणतीही कारवाई झालेली नाही. हा शेतकऱ्यांवर एक प्रकारचा अन्याय आहे. तसेच, १३ जानेवारी २०२६ रोजी तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली चेंबरमध्ये एक बैठक झाली. कराडचे तहसीलदार, शेतकरी, भूमी अभिलेख अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग कराड उत्तर आणि पोलिस प्रशासनाचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते. त्यावेळी तहसीलदारांनी संबंधित विभागांना आदेश दिले होते की, पुढील ७ दिवसांत ८ मीटर रस्त्याच्या अधिग्रहणाचे मोजमाप करून अधिकृत नोंद केली जाईल. आजपर्यंत यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. रस्त्याचा अधिकृत रेकॉर्डही तयार झालेला नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याचे काम कोणत्या नियमांनुसार सुरू केले, याची चौकशी करणे आवश्यक आहे.

मसूर रेल्वे पुलाजवळील कंत्राटदाराने केलेल्या कथित भूसंपादनाच्या समस्या आणि जबरदस्तीने बांधकाम 

 करण्यात येत आहे. मसूर रेल्वे पूल विभागाच्या पलीकडे कोणतेही भूसंपादन झालेले नाही. परंतु रस्त्याचे काम सुरू आहे. कंत्राटदार शेतकऱ्यांना धमकावत आहे आणि गुंड पद्धती वापरत आहे 

बाधित शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई द्यावी आणि शामगाव घाट आणि शिवडे गावाच्या हद्दीतील काम थांबवावे. मागण्या पूर्ण न झाल्यास २६ जानेवारी रोजी सकाळी  ११ वाजता कराड तहसील कार्यालयसमोर रक्षक प्रतिष्ठान सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन सामूहिक आत्मदहन  करणार असल्याचेही मनोज माळी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

फोटो : 

कराड : रक्षक प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष मनोज माळी यांनी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना दिले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कोरेगाव तालुक्यात पाच उमेदवारांची माघार; . शिवसेना–भाजप महायुतीच्या विरोधात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट अशी थेट लढत रंगण्याची चिन्हे
पुढील बातमी
साताऱ्यात ७७ व्या प्रजासत्ताक दिनाची जोरदार तयारी; पालकमंत्री शंभूराज देसाई व जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजवंदन होणार

संबंधित बातम्या