ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत घोषणा

by Team Satara Today | published on : 21 March 2025


मुंबई : ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना २०२४ चा  महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत केली.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली १२ मार्च, २०२५ रोजी पुरस्कार समितीची बैठक झाली. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार पुरस्कारासाठी शिल्पकार श्री. राम सुतार यांची २०२४ च्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. पंचवीस लाख रुपये, मानपत्र, मानचिन्ह, आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

राम सुतार यांना जाहीर झालेला ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार म्हणजे त्यांच्यावरील निखळ प्रेमाचं प्रतिक
ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना जाहीर झालेला राज्याचा सर्वोच्च ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार हा राज्यातल्या तेरा कोटी जनतेच्या त्यांच्यावरील निखळ प्रेमाचं प्रतिक आहे. हा महाराष्ट्राच्या इतिहास, कला, सांस्कृतिक क्षेत्राचा गौरव आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद व्यक्त करीत त्यांचे अभिनंदन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
नियमबाह्य भाडे आकारणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांच्या तक्रारीसाठी लवकर व्हाट्सअप क्रमांक : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
पुढील बातमी
उन्हाळ्यात रक्तदात्यांनी रक्तदानाच्या सर्वश्रेष्ठ कार्यात सहभागी व्हावे : सार्वजनिक आरोग्यमंत्री मंत्री प्रकाश आबिटकर

संबंधित बातम्या