छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोडीलिपीतील पत्रांचे वाचन

by Team Satara Today | published on : 25 November 2025


सातारा  : जागतिक वारसा सप्ताहानिमित्त दि. 23 नोव्हेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाच्यावतीने व इतिहास संशोधन व वारसा जतन संस्था सातारा व दुर्गनाद ट्रेकींग अँव्हेंचर सातारा यांचे सहकार्याने छत्रपति शिवाजी महाराजांच्या मोडितील पत्रांचे मोडीलिपी तज्ञ घनश्याम ढाणे यांनी वाचन करून मार्गदर्शन केले.

यामध्ये दुर्गनाद ट्रेक अँव्हेंचर सातारा, छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथील इतिहास विभाग, त्याचप्रमाणे इतिहास संशोधन व वारसा जतन संस्था सातारा, वेद बचत गट सदस्यांनी इतिहासप्रेमींनी भाग घेतला. यावेळी इतिहासप्रेमी नागरिकउपस्थित होते. कार्यक्रमानंतर उपस्थित इतिहासप्रेमींचे संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी आभार मानले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
३५०० रूपये दर जाहीर करा अन्यथा साखर कारखान्यासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन- राजू शेट्टी, दर घेतल्याशिवाय मागे न हटण्याचा शेतक-यांचा निर्धार
पुढील बातमी
साताऱ्यात जुना मोटर स्‍टॅन्‍ड येथे जुगाराचे साहित्य जप्त

संबंधित बातम्या