गुजरातमधील महिसागर नदीवरील पूल कोसळून ३ जणांचा मृत्यू

by Team Satara Today | published on : 09 July 2025


गुजरात : गुजरातमधील महिसागर नदीवर बांधलेला पूल कोसळला आहे. या अपघतात पाच वाहने पुलावरून खाली पडली तर तीन जणांना मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. याचवेळी पाच जणांना वाचवण्यात यश आल्याचेही सांगण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  हा पूल १९८५ मध्ये बांधण्यात आला होता. घटनेनंतर गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांनी तज्ञांचे एक पथक घटनास्थळी पाठवले असून त्यांच्याकडे चौकशीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पूल कोसळण्याच्या घटनेबद्दल रस्ते आणि इमारती विभागाचे सचिव पी.आर. पटेलिया म्हणाले, “गंभीरा पूल खराब झाल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे ज्यामुळे ही दुर्घटना घडली. तज्ञांची एक टीम घटनास्थळी पाठवण्यात आली आहे.”

पूल कोसळल्याने नदीत पडलेल्या ५ वाहनांपैकी दोन ट्रक पूर्णपणे नदीत बुडाले, तर एक टँकर अर्धा लटकलेला राहिला. पूल कोसळताच घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला आणि तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, हा पूल १९८१ मध्ये बांधण्यात आला होता. १९८५ मध्ये तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. परंतु कालांतराने पुल जीर्ण होऊ लागला. स्थानिक आमदार चैतन्य सिंह झाला यांनी या पुलाबद्दल आधीच इशारा दिला होता आणि नवीन पूल बांधण्याची मागणी केली होती. असे असूनही, पुलावरून वाहनांची वाहतूक थांबली नाही. आता सरकारने २१२ कोटी रुपये खर्चाच्या नवीन पुलाच्या बांधकामाला मान्यता दिली आहे आणि त्यासाठी सर्वेक्षण देखील करण्यात आले आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता,  मुख्यमंत्र्यांनी तांत्रिक तज्ज्ञांची टीम घटनास्थळी पाठवून चौकशीचे आदेश दिले आहेत. अपघातानंतर लगेचच अधिकारी सक्रिय झाले आणि नदीत पडलेल्या वाहनांना बाहेर काढण्याचे काम सुरू करण्यात आले. त्याच वेळी, पोहणाऱ्यांनी मृतदेह बाहेर काढण्यास सुरुवात केली.

६ जण पाड्रा येथील स्थानिक रुग्णालयात तर  २ जण वडोदरा रुग्णालयात  उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत.  या अपघातात ८ जण जखमी झाले आहेत. ६ जणांना पाड्रा रुग्णालयात आणि २ जणांना वडोदऱ्यातील सयाजी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच लोकांची गर्दी जमली होती. त्यांनी प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला. ४५ वर्षे जुन्या या पुलाची दुरुस्ती करण्यासाठी प्रशासनाला अनेक वेळा कळवण्यात आल्याचे लोकांनी सांगितले. प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्यामुळे आज ही दुर्घटना घडली. या अपघाताला प्रशासन पूर्णपणे जबाबदार असल्याचा आरोप स्थानिक लोक करतात.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जेरबंद केलेला बिबट्या सातारला हलविला
पुढील बातमी
सातारा बसस्थानक पुनर्बांधणीच्या कामांना लवकरच होणार सुरुवात

संबंधित बातम्या