सातारा : सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या पार्किंग परिसरातून स्प्लेंडर प्लस दुचाकीची चोरी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एम.एच. ६० ये.वाय. २५५६ क्रमांकाची, सुमारे वीस हजार रुपये किमतीची ही मोटरसायकल अज्ञात चोरट्यांनी पळवून नेली.
याबाबत अनिकेत विजय शिर्के (वय ३०, रा. चंचळी, ता. कोरेगाव) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली असून याबाबतचा अधिक तपास पोलीस हवालदार मेचकर करत आहेत.