सातारा : सोमवार पेठ सातारा येथील राधाकृष्ण मंदिरातील देवाच्या गळ्यातील सोन्याचांदीचे आभूषणाची चोरीची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्यांनी बेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला आहे.
याबाबत माहिती अशी, राधाकृष्ण मंदिरातून अज्ञात चोरट्यांनी दि १० रोजी रात्री आठ ते सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मंदिराचे कुलूप तोडून मंदिरामध्ये प्रवेश केला. यावेळी मंदिरातील कृष्णमूर्तीच्या गळ्यातील १२० ग्रॅम वजनाचा चांदीचा हार, १८० ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुलामा दिलेला हार, देवीच्या मूर्तीच्या गळ्यातील 1१०० ग्रॅम वजनाचा चांदीचा हार (सोन्याचा मुलामा दिलेला)श्रीकृष्ण मूर्तीच्या गळ्यातील तीन ग्रॅम वजनाचे ओम अक्षराचे लॉकेट असा एकूण ४२ हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरी केले आहे. याबाबतची फिर्याद जगदीश माधवदास रोहिरा (वय ६१ रा. सह्याद्री पार्क, आंबेदरे रोड, शाहूपुरी) यांनी शाहूपुरी पोलिसात दिली असून अधिक तपास पोलीस हवालदार मदने करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.