सातारा : शिवीगाळ, दमदाटी प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. एक रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पिरवाडी, सातारा येथे रोहित मोहन शिंदे रा. पिरवाडी, सातारा यांना जुन्या वादाच्या रागातून शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी आफताब असिफ शेख, निहाल युसुफ शेख आणि मोहम्मद नूरसाब कालदगी सर्व रा. पिरवाडी, सातारा यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान आफताब असिफ शेख यांनी दिलेल्या तक्रारीत रोहित मोहन शिंदे यांनी त्यांना शिवीगाळ दमदाटी करून हाताने मारहाण केल्याचे म्हटले आहे. दोन्ही गुन्ह्यांचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गवळी करीत आहेत.