सातारा : विनापरवाना डॉल्बी वाजवल्या प्रकरणी एका विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 12 रोजी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास वनगळ, ता. सातारा येथे तेथीलच सौरभ मिलिंद गाडे याने कोणतीही परवानगी न घेता डॉल्बी वाजवून बैलांच्या मिरवणुकीचा कार्यक्रम केला होता. याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यात गाडे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार कुमठेकर करीत आहेत.