बांगलादेश मधील हिंदूंना संरक्षण द्यावे

केंद्र सरकारने दखल घ्यावी : सकल हिंदू समाजाची मागणी

by Team Satara Today | published on : 29 November 2024


सातारा : बांगलादेश मधील हिंदूंच्या होणाऱ्या हत्या थांबवण्यासाठी केंद्र सरकारने दखल घ्यावी अशी मागणी सातारा येथे सकल हिंदू समाजांनी निवेदनाद्वारे केली. 

बांगलादेशमध्ये सत्ता परिवर्तन करून आल्यानंतर त्या ठिकाणच्या हिंदू नागरिकांच्या हत्या होत आहेत,  महिला मुलींच्या वर अत्याचार होत आहेत, युवकांना मारहाण होत आहे, आपली घरे दारे मालमत्ता सोडून पळून जावे लागत आहे. 

इस्कॉन संस्थेने बांगलादेशी नागरिकांना अन्न पाणी पुरवले त्या इस्कॉन संस्थेचे स्वामी चिन्मय कृष्णदास यांना अटक करून त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला भरण्यात आला आहे, इस्कॉन संस्थेची मान्यता रद्द करण्याचे काम चालू आहे. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, हिंदू एकता आंदोलन, बजरंग दल, हिंदू महासभा, भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी साताऱ्यात शिवतीर्थावरील श्री छ शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पोवई नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी निषेध यात्रा काढत याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी महोदय सातारा यांना दिले.

भारत सरकारने बांगलादेश मधील हिंदूंच्यावर होणाऱ्या अत्याचारा बाबतीत लक्ष घालून बांगलादेश मधील हिंदूला संरक्षण द्यावे. अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आणि याबाबतीत माननीय माननीय राष्ट्रपती यांच्याकडे पाठपुरावा करण्याची विनंती केली. 

यावेळी साताऱ्यातील हिंदू संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात शीतलहरीमुळे गारठा कायम
पुढील बातमी
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचले दरे गावात

संबंधित बातम्या