सातारा : चोरी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 21 रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कुमार बाळासाहेब चव्हाण रा. उत्तेकर नगर, सदर बाजार, सातारा यांच्या मालकीच्या मोरया मेगा मार्ट देगाव रोड, सातारा येथे चोरी करण्याचे उद्देशाने पत्र्यावर चढून मॉलचा पत्रा लोखंडी कटावणीच्या साह्याने कापून मॉलमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी मोहसीन पठाण आणि अली मुलाणी दोन्ही रा. विलासपूर, कोडोली, सातारा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार सूर्यवंशी करीत आहेत.
चोरी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा
by Team Satara Today | published on : 22 December 2024