सातारा : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा परिषद व स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने 'दिव्यांग बालकांच्या सक्षमीकरणासाठी शिबीराचे आयोजन स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे करण्यात आले होते.
शिबीराचे उद्घाटन अरविंद वाघमारे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, सातारा यांचे शुभहस्ते झाले. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता विनायक काळे, युवराज करपे, जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव निना बेदरकर आदी उपस्थित होते.
या शिबीरात दिव्यांग बालकांना युडीआयडी कार्ड, आयुष्मान कार्ड व आभा कार्ड नोंदणी करण्यासाठी आवश्यक वैद्यकीय तपासणी करण्यात आली. शिबीरात सातारा जिल्हयातील १६ शासकीय शाळा व अशासकीय संस्था येथील बालकांना प्रमाणपत्र मिळण्यासाठी प्रयोजन करण्यात आले.शिबीरात एकूण ९५ दिव्यांग बालकांची आभा कार्ड, आयुषमान कार्ड, युडीआयडी या करता नोंदणी करण्यात आली.