संजय राऊतांच्या वक्तव्याची पर्यटनमंत्री शंभुराज देसाईंनी उडवली टर

by Team Satara Today | published on : 12 July 2025


कराड : संजय राऊत यांना वाटतयं की त्यांच्या मनात आहे तेच व्हावे. संजय शिरसाट हे दौऱ्यावरुन आले. ते दौऱ्यावरुन आल्यावर त्यांची बॅग शिपायाने आणुन त्यांच्या टेबलवर ठेवली. दौऱ्यावर जाताना माणुस पैशांची बॅग घेवुन फिरतो का? अशा शब्दात खासदार राऊत यांच्या वक्तव्याची पर्यटनमंत्री शंभुराज देसाई यांनी खिल्ली उडवली.

मंत्री शंभुराज देसाई हे कराड (जि.सातारा) येथे माध्यमांशी बोलत होते. संजय शिरसाट हे दौऱ्यावरुन आले. ते दौऱ्यावरुन आल्यावर त्यांची बॅग शिपायाने आणुन त्यांच्या टेबलवर ठेवली. ती बॅग पैशाची होती असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. त्यावर मंत्री देसाई म्हणाले, ठेवली. दौऱ्यावर जाताना माणुस पैशांची बॅग घेवुन फिरतो का? संजय राऊत यांना वाटतयं की त्यांच्या मनात आहे तेच व्हावे. मात्र तसे होत नाही.

मराठीच्या मुद्यावर उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आले आहेत असे सांगुन मंत्री देसाई म्हणाले, मराठीच्या मुद्यावर दोन भाऊ एकत्र आले. त्यांच्या मेळाव्यानंतर राज ठाकरे यांनी मला विचारल्याशिवाय पदाधिकाऱ्यांनी काही राजकीय बोलायचे नाही असे आदेश दिले आहेत. त्यामुळे त्यांची भुमिका स्पष्ट झाल्यावर आम्ही आमची भुमिका जाहीर करु.

अलमट्टीची उंची वाढवल्यावर सांगली, सातारा, कोल्हापुर जिल्ह्याला त्याचा फटका बसणार आहे. त्यावर सांगली, कोल्हापुर जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांची विधानभवनात बैठक झाली असल्याचे सांगुन मंत्री देसाई म्हणाले, महापुर येणार नाही यासंदर्भात दक्षता घेण्यात येणार आहे. अलमट्टीच्या उंची वाढवल्यावर काय परिणाम होणार याचे सादरीकरण केंद्राकडे करण्यात येणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मोळाचा ओढा चौकातील भंगाराच्या दुकानाला भीषण आग
पुढील बातमी
एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन

संबंधित बातम्या