कोल्हापूरच्या जोतिबा मंदिरात राडा; पालखी सोहळ्यात पुजारी आणि भाविक भिडले; २५ जणांवर गुन्हे दाखल

by Team Satara Today | published on : 24 March 2026


कोल्हापूर : कोल्हापूरातील जोतिबा मंदिराचे १० पुजारी आणि १५ भाविकांमध्ये झालेल्या संघर्षानंतर या दोन्ही गटांतील व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

पोलिसांच्या माहीतीनुसार, रविवारी दुपारी मंदिराच्या पालखीच्या मार्गात अडथळा निर्माण झाल्यानंतर पुजाऱ्यांनी भाविकांना मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. करवीर गावातील भाविक धार्मिक मिरवणुकांमध्ये वापरली जाणारी पवित्र सासन काठी घेऊन मंदिरात आले होते.

हे भाविक नृत्य करत असताना मंदिराच्या देवतेची पालखी तिथून जात होती आणि तिच्या मार्गात अडथळा निर्माण झाला. जेव्हा पुजाऱ्यांनी या भाविकांना नृत्य करण्यापासून रोखण्याचा आणि पालखीसाठी वाट करून देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा दोन्ही गटांत संघर्ष उफाळून आला.

या झटापटीदरम्यान भाविकांनी पुजाऱ्यांना धक्काबुक्की केली. त्यांनंतर त्यातील १० पुजाऱ्यांनी भाविकांना मारहाण केली. गावाच्या प्रमुखांनी मध्यस्थी केल्यानंतर हा संघर्ष थांबला. गावाच्या प्रमुखांनी मंदिराकडे लेखी माफीनामा सादर केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सर्वांना नोटीस बजावण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
प्रहार दिव्यांग संघटनेचे फलटण तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन ; लेखी दिल्याशिवाय जागेवरून उठणार नाही
पुढील बातमी
साताऱ्यातील राजकीय रणकंदनाचे लोन विधिमंडळात

संबंधित बातम्या