फलटण : फलटण-पंढरपूर रस्त्यावरील बरड (ता. फलटण) गावच्या हद्दीत गुरुवारी पहाटे भरधाव वेगात असणार्या एका कंटेनरने कारला धडक दिली. या भीषण अपघातात कारमधील तिघे ठार झाले. मृतांमध्ये खंडाळ्यातील खेड बुद्रुक व पाडेगाव तसेच खटावमधील वेटणे येथील युवकाचा समावेश आहे. या तिन्ही गावांवर शोककळा पसरली आहे. अपघातानंतर संशयित कंटेनरचालक पसार झाला आहे.
सागर रामचंद्र चौरे (वय 34, रा. पाडेगाव ता. खंडाळा), भाऊसो आप्पा जमदाडे (45, रा. खेड बुद्रुक, ता. खंडाळा) व नीलेश चंद्रकांत शिर्के (40, रा. वेटणे, ता. खटाव) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी कारमालक सूरज संतोष खरात (रा. पाडेगाव) यांनी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, भाऊसो जमदाडे व नीलेश शिर्के यांचा ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय आहे. त्यांचा विजापूर येथे एक ट्रक बंद पडला होता. हा ट्रक दुरुस्त करून तो लोणंदमध्ये आणायचा होता. यासाठी नीलेश व भाऊसो यांनी मॅकेनिक सागर चौरे यांना सोबत घेतले होते. हे सर्वजण सूरज खरात यांची चार दिवसांपूर्वी घेतलेली नवी कोरी कार घेऊन विजापूरला गेले होते. विजापूरमधील बंद पडलेल्या ट्रकचे काम झाल्यानंतर दिवाळी सणासाठी हे सर्व दि. 31 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री विजापूरहून निघाले होते. त्यांची कार पहाटे 4.30 च्या सुमारास बरड गावच्या हद्दीत आली असता या कारला फलटण- पंढरपूर रोडलगत बागेवाडी पेट्रोल पंपाच्या जवळ फलटणहून पंढरपूरकडे जाणार्या कंटेनरने (क्रमांक एम. एच. 46. सीएल 9651) समोरा-समोर धडक दिली.
कंटेनरने दिलेल्या धडकेत कारच्या पुढील बाजूचा चक्काचूर झाला. या अपघातात तिघे जण गंभीर जखमी झाले. अपघाताचा मोठा आवाज झाल्याने स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी खासगी दवाखान्यात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेनंतर कंटेनरचालक पसार झाला. परंतु, बरड गावच्या पुढे आल्यानंतर राजुरी गावच्या हद्दीत या कंटेनरचा रेडिएटर फुटल्याने चालक कंटेनर तिथेच सोडून पसार झाला. या भीषण अपघाताची माहिती समजल्यानंतर पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी घटनास्थळी भेट दिली.
गळफास घेवून युवकाची आत्महत्या |
संविधानाचा आधुनिक राष्ट्र निर्मितीचा संकल्प साकारण्याचे आव्हान : अन्वर राजन |
सातारा एसटी स्टँड परिसरातील बंद टपऱ्या हटवल्या |
जिल्ह्यात कॅबिनेट मंत्रीपदाचा मान कोणाकोणाला ? |
सहकारातील प्रतिकूल परिस्थितीतही गॅलेक्सीने निर्धाराने टाकलेले एकेक पाऊल यशस्वी झाले : रामभाऊ लेंभे |
ग्राहकांनी पाणी देयके 15 डिसेंबरपर्यंत भरावीत |
खा. उदयनराजेंच्या एका फोनने वाचला तरुणाचा जीव |
जनता सहकारी बँक साताराच्यावतीने रविवारी कार्यशाळा, प्रशिक्षण |
जनतेने एक विकासाभिमुख नेतृत्व विधान सभेमध्ये पाठवले : प्रा. दशरथ सगरे |
कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी समोर आत्मक्लेश आंदोलन |
चंद्रशेखर गावस, राजीव मुळ्ये यांना गुंफण पुरस्कार जाहीर |
ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील थंडी गायब |
दिव्यांग-अव्यंग व्यक्तींना विवाहास प्रोत्साहन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन |
फळबागांच्या उत्पादन वाढीसाठी पाडेगाव फार्म येथे खत व्यवस्थापन प्रात्यक्षिक |
पत्नीचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा |

अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
वृद्ध महिलेच्या फसवणूक प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
मारहाण प्रकरणी दोनजणांवर गुन्हा |
सातारा स्थानिक गुन्हे शाखेची पिस्टलची शतकी कारवाई |
पेरलेत झाडे तोडताना नियमांना 'फाटा' |