सातारा : अल्पवयीन मुलीवर अत्याचारासह बालविवाह कायद्यांतर्गत पाच जणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मे 2024 दरम्यान सातारा शहर परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीशी लग्न करून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी तसेच बालविवाह कायदा अंतर्गत अल्पवयीन मुलीचा पती, सासू, सासरे, आई, वडील अशा पाच जणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ढेरे करीत आहेत.