09:06pm | Dec 03, 2024 |
सातारा : शिरवळ येथील शिंदेवाडी परिसरात पिस्टलची विक्री करण्यासाठी आलेल्या संशयिताकडून सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाने (एलसीबी) ४ पिस्टल व ४ जिवंत काडतुसे जप्त केली. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत एक संशयित पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
शुभम उर्फ सोनु अनिल शिंदे (वय २४ वर्षे रा. महर्षीनगर, स्वारगेट पुणे जि. पुणे) असे अटक केलेल्या संशयित युवकाचे नाव आहे. दरम्यान, त्याचा साथीदार पळून गेला असून त्याने त्या साथीदाराचे नाव पोलिसांना सांगितले आहे.
दि. २ नोव्हेंबर रोजी शिंदेवाडी ता. खंडाळा येथील राष्ट्रीय महामार्गावरील सर्व्हिस रोडनजीक असलेल्या एका कंपनीजवळ देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुसे विक्री करण्याकरीता काहीजण येणार असल्याची माहिती एलसीबीला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावला. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरुन दोघे येत असल्याचे पोलिसांना दिसताच त्यांनी थांबण्यास सांगितले. मात्र संशयितांनी दुचाकी पळवली. पोलिसांनी पाठलाग करुन दुचाकीवर पाठीमागे बसलेल्याला पकडून ओढले.
पोलिसांनी संशयिताकडे तपासणी केली असता त्याच्याकडे सॅक होती. सॅकमध्ये ४ पिस्टल व ४ जिवंत काडतुसे निघाली. यामुळे पोलिसांनी हत्यारे जप्त करुन संशयिताला ताब्यात घेतले.
या कारवाईत पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सुधीर पाटील, रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, परितोष दातीर, शिवाजी गुरव, संजय शिर्के, विजय कांबळे, संतोष सपकाळ, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, निलेश फडतरे, अमित झेंडे, प्रवीण फडतरे, अमित माने, शिवाजी भिसे, अरुण पाटील, गणेश कापरे, अविनाश चव्हाण, स्वप्निल कुंभार, ओमकार यादव, मोहन पवार, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाने, पृथ्वीराज जाधव, संकेत निकम, रविराज वर्णेकर, विजय निकम यांनी सहभाग घेतला.
प्रजासत्ताक दिन तयारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या शहरातील विविध ठिकाणी भेटी |
साताऱ्यात दि. २६ रोजी जयपूर फूट शिबिराचे आयोजन |
थोरले प्रतापसिंह हे काळाच्याही पुढे असणारे प्रजाहितदक्ष राजे होते |
संघर्षशील एन.डी. सरांना कृतिशील राहून आवाज उठवणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल |
जीवन परिवर्तनात पुस्तकांची भूमिका मोलाची |
भाजपचे सातारा शहरात सदस्यता नोंदणी अभियान |
जाचहाट प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
मारहाण प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेस मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
प्रजासत्ताक दिनाचे दिमखादार आयोजन करावे |
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
गोडोलीत 36 हजारांची घरफोडी |
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा |
पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाची अडीच लाखांची फसवणूक |
भाजपचे सातारा शहरात सदस्यता नोंदणी अभियान |
जाचहाट प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
मारहाण प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेस मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
प्रजासत्ताक दिनाचे दिमखादार आयोजन करावे |
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
गोडोलीत 36 हजारांची घरफोडी |
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा |
पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाची अडीच लाखांची फसवणूक |
अवैधरित्या अग्नीशस्त्र बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
‘मानिनी जत्रा’ सारखे उपक्रम बचतगटांसाठी नवसंजीवनी |
आई, मी 1000 सूर्यनमस्कार पुर्ण केले..!’ |
डिजिटल नकाशे म्हणजे मालमत्तेचे वैध पुरावे |
जिल्ह्यात पुन्हा एकदा ''शंभूराज" |