सातारा : सातारा जिल्हयातील जावळी तालुक्यामध्ये अवैद्य मद्य विक्री बाबत वारंवार तक्रारी प्राप्त होत असून सबर ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क, विभागाच्या विविध पथकांनी वेळोवेळी अवैद्य मद्य वाहतुक विक्रीवर कारवाई करुन महाराष्ट्र दारुबंदी अधीनियम १९४९ अन्वये गुन्हे दाखल करुन सराईत गुन्हेगारांविरुद्ध याच अधीनियमाचे कलम ९३ अन्वये चांगल्या वर्तवणुकीचे बंधपत्र घेण्याबाबत मा. उप विभागीय अधीकारी यांचेकडे वेळोवेळी प्रस्ताव सादर केलेले आहेत. तसेच जावळी तालुका व संपूर्ण सातारा जिल्हयामध्ये कोणत्याही ठिकाणी अवैद्य मद्य निर्मिती, वाहतुक, विक्री होत असल्याचे निर्दशनास आल्यास त्याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ व्हाटसअप क्रमांक ८४२२००११३३ वर संपर्क साधून तक्रार नोंदवावी तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल याची नोंद घ्यावी. असे आवाहन अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सातारा यांनी केले आहे.
जिल्ह्यात अवैद्य मद्य निर्मिती, वाहतुक, विक्री होत असल्यास राज्य उत्पादनशुल्क विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर कळवावे
by Team Satara Today | published on : 26 July 2025

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या

सज्जनगडावरील पार्किंगमध्ये वृद्धास मारहाण केल्याने एकावर गुन्हा
October 15, 2025

महा रक्तदान शिबिरात सातारकरांचा भव्य प्रतिसाद
October 15, 2025

महिला आयोग आपल्या दारी उपक्रमाचे 16 ऑक्टोबर रोजी आयोजन
October 15, 2025

महावितरण कार्यालयांची पुनर्रचना
October 15, 2025

वडूज शहरातून स्वयंसेवकांचे शिस्तबद्ध संचलन
October 15, 2025

तुमचे पैसे बँकेत बेवारस पडले, ओळख पटवा व घेऊन जा
October 15, 2025

नोकरी, उद्योगासाठी पुण्या-मुंबईची गरज नाही : आ. महेश शिंदे
October 15, 2025

दिव्यांग बालकांच्या सक्षमीकरणासाठी शिबीर संपन्न
October 15, 2025

कोरेगावात दोन एकर ऊस आगीत जळून खाक; सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान
October 14, 2025