सातारा : नामदेववाडी झोपडपट्टी येथे झालेल्या राड्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.
अरुण रामा खवळे यांनी रामा जाधव, सुनील जाधव, सागर खवळे, सचिन खवळे, लक्ष्मण जाधव, अर्जुन खवळे, मारुती खवळे, किसन खवळे यांच्यासह २४ जणांविरुध्द तक्रार दिली आहे.
दुसरी तक्रार रामा लक्ष्मण जाधव यांनी अरुण खवळे, सुनील खवळे, अनिल खवळे, अशोक पिटकर, संजय गायकवाड, अरुण पिटेकर, सुरज रामदांडे, बबलू जाधव यांच्यासह १६ जणांविरुध्द तक्रार दिली आहे. जुन्या भांडणाच्या कारणातून कोयता, लाकडी दांडक्याने मारहाण करत शिवीगाळ, दमदाटी केली असल्याचे तक्रारींमध्ये म्हटले आहे.