सातारा : महिलेस मारहाण केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 3 रोजी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास चंदन नगर कोडोली येथील एका महिलेस मारहाण तसेच शिवीगाळ केल्याप्रकरणी सुरज जाधव व त्याच्या पत्नी विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार डी.बी. यादव करीत आहेत.