मागसवर्गीयांच्या शौचालयप्रश्नी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करु; झेडपी सीईओंच्या आश्वासनानंतर रमेश उबाळे यांचे आंदोलन स्थगित

by Team Satara Today | published on : 23 December 2025


सातारा : शिरढोण ता. कोरेगाव येथील मागासवर्गीय महिलांचे पाडलेल्या शौचालंयाचे काम सहा महिने विलंब लावणाऱ्या संबधीत अधिकाऱ्यांची चौकशी करुन त्यांच्यावर उचित कारवाई करण्याचे लेखी आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी याशिनी नागराजन यांनी उपमुख्य कार्यकारी यांना देऊन रिपब्लिकन सेनेचे नेते रमेश उबाळे यांना उपोषण आंदोलन मागे घेण्याची विनंती केल्यानंतर आंदोलकानी आपले आंदोलन मागे घेतले.

शिरढोण येथील मागासवर्गीय महिलांचे सार्वजनिक आठ स्वच्छतागृह एका समाजकंटकाने पाडल्याच्या घटनेच्या निषेधार्थ रमेश उबाळे यांनी गुरुवारी जिल्हा परिषदेसमोर यांनी बेमुदत उपोषण सुरू केले. होते गेली चार दिवस हे उपोषण आंदोलन सुरूच होते. पाच महिने झालेतरी महिलांसाठी पंचायत समितीच्या ग्रामपंचायतीने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याने महिलांना उघड्यावरच शौचास बसावे लागत आहे. विशेष म्हणजे कोरेगाव पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी महिला आहेत तरीही त्यांनी आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे हेच आमचे दुर्दैव आहे, म्हणून महिला गटविकास अधिकारी व शिरढोणच्या सरपंचांना तात्काळ निलंबीत करुन शिरढोण येथील महिलांसाठी ताबडतोब स्वच्छतागृह बांधून दिल्याशिवाय आपण आपले उपोषण आंदोलन मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिकाही त्यांनी व्यक्त केली होती. दरम्यान सोमवारी मुख्याधिकारी याशिनी नागराजन यांनी रमेश उबाळे वं उपस्थित आंदोलकांना लेखी पत्र देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.

या आंदोलनात रमेश उबाळे यांचेबरोबर रिपब्लिकन सेनेचे महासचिव नितीन रोकडे, तालूका अध्यक्ष दीपक गाडे, गौतम रणदिवे, रमेश गायकवाड, उजवला कांबळे, अरुणा खंडाईत, सविता खंडाईत, अनिता खंडाईत, सविता खंडाईत, अनिता खंडाईत, सुजाता खंडाईत, वंदना खंडाईत, सुनीता जावळे, सारिका येंवले, सुनीता येंवले, सूनंदा खंडाईत, हेमाताई खंडाईत, शर्मिला खंडाईत, निरा कांबळे, आदी महिला सहभागी झाल्या होत्या.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सर्व विभागांनी एकत्रित जिल्हा परिषद म्हणून कामकाज करावे - डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा परिषदेचे चार वर्षांचे वार्षिक तपासणीचे अहवाल वाचन
पुढील बातमी
साताऱ्यामध्ये सोने लुटणारा भामटा अखेर जाळ्यात; गुन्हे प्रकटीकरण शाखेची पाथर्डी तालुक्यात कारवाई, साडेचार लाखाचा सोन्याचा मुद्देमाल जप्त

संबंधित बातम्या