रिषभ पंत ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतासाठी खेळणार नाही?

by Team Satara Today | published on : 04 October 2025


नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाला येत्या काही दिवसात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जायचे आहे. ऑक्टोबर - नोव्हेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय संघाला वनडे आणि टी२० मालिका खेळायची आहे. या मालिकांसाठी शनिवारी (४ ऑक्टोबर) भारतीय संघाची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. 

त्यामुळे आता या मालिकांसाठी कोणाकोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष असेल. विराट कोहली - रोहित शर्मा यांच्या वनडे मालिकेतील निवडीकडेही लक्ष असेल. पण यादरम्यानच एक महत्त्वाचे अपडेट्स समोर आले आहेत.

भारताचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतची या दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड होणार नाही. तो अद्याप त्याच्या पायाच्या दुखापतीतून पूर्ण तंदुरुस्त झालेला नाही. 

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयच्या सुत्राने सांगितले आहे की त्याच्या तंदुरुस्तीची प्रक्रिया धीम्यागतीने होत आहे. त्याची कमी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मधल्या फळीत जाणवेल. त्याच्यासारखा प्रभाव पाडण्याऱ्या मधल्या फळीतील फलंदाजाला भारताने आशिया कपमध्ये मिस केले, जरी संजू सॅमसनने चांगली कामगिरी केली असली तरी.'

पंत आता भारतात १४ नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेतून भारतीय संघात पुनरागमन करण्याची दाट शक्यता आहेत. पंतला जुलैच्या अखेरीस इंग्लंड दौऱ्यातील चौथा कसोटी सामना खेळताना ख्रिस वोक्सचा चेंडू तळपायावर लागला होता. त्यामुळे पंतच्या तळपायाला फ्रॅक्चर झालं होतं. त्यामुळे त्याला या दौऱ्यातील पाचवा सामना खेळता आला नव्हता. तसेच त्यातून अजून तो सावरत आहे. 

या दुखापतीमुळे त्याला आशिया कप २०२५ स्पर्धा आणि वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिकेलाही मुकावे लागले आहे.

पंतने मागच्या महिन्याच मुंबईतील स्पेशालिस्ट डॉक्टरांचीही भेट घेऊन त्यांच्याकडून सल्ले घेतले होते. आता तो नोव्हेंबरमध्ये पुन्हा मैदानात दिसण्याची अपेक्षा आहे.

भारतीय संघाला ऑस्ट्रेलियामध्ये १९ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर दरम्यान तीन वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे. त्यानंतर टी२० मालिका खेळली आहे, जी २९ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर दरम्यान खेळवली जाईल.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बेकायदा होर्डिंग्ज दिसल्यास अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी
पुढील बातमी
महाराष्ट्रावर 'शक्ती' चक्रीवादळाचे संकट !

संबंधित बातम्या